मी नपुंसकांना घाबरत नाही, जेटलींना घरचा आहेर

डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या अरुण जेटली यांना भाजप खासदार किर्ती आझाद यांनी घरचा आहेर दिलाय. 

Updated: Dec 22, 2015, 09:33 AM IST
मी नपुंसकांना घाबरत नाही, जेटलींना घरचा आहेर title=

नवी दिल्ली : डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या अरुण जेटली यांना भाजप खासदार किर्ती आझाद यांनी घरचा आहेर दिलाय. 

आपल्याविरोधातही जेटलींनी दावा ठोकावा, असं आव्हानच आझाद आपल्याच पक्षातील जेटलींना दिलंय. जीवाला धोका असल्यानं अनेक यंत्रणांनी आपल्या निवासस्थानी येऊन सुरक्षेची खबरदारी घेण्याचं सांगितल्याचं ट्विट आझाद यांनी केलं. मात्र अरुण जेटली यांना टॅग करत आपण नपुंसकांना घाबरत नसल्याचं आझाद यांनी ट्विटवर म्हटलं.

अधिक वाचा - एक पैसाही घेतला नाही - अरुण जेटली 

 

दरम्यान, काही तासांतच आझाद यांनी कोलांटउडी मारत जेटलींबद्दल 'नपुंसक' असा उल्लेख असलेलं ट्विट आपण केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. आपलं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती त्यांनी या ट्विटरच्या माध्यमातून दिली. आता, किर्ती आझाद यांच्यावर काय कारवाई करावी, असा प्रश्न भाजपला पडलाय.

अधिक वाचा -  अरुण जेटली करणार केजरीवालांविरोधात केस

दरम्यान, डीडीसीएच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आरोपांनंतरही भाजप ठामपणे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पाठीशी उभी आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जेटलींची पाठराखण केलीय. जेटली यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं शाह यांनी म्हटलंय.