www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
‘फेसबुक’वरून झालेल्या ओळख झालेल्या ‘बॉयफ्रेंड’नं टाळलं म्हणून आठवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीनं आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना घडलीय ‘आयटी सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात…
सप्टेंबर महिन्यात मनोज नामक एका तरुणाकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट रिया (बदललेलं नाव) केली. मनोज हा येलहंकामधील एका नामांकित महाविद्यालयात बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. हॉलिवूड हिरोंप्रमाणे बाईक चालवण्याचा दावा करणाऱ्या या मुलाच्या प्रोफाईलनं रिया त्याच्याकडे आकर्षित झाली.
महत्त्वाचं म्हणजे, शिखाया घरी इंटरनेट नसताना ती केवळ मनोजसोबत चॅटींग करण्यासाठी इंटरनेट कॅफे गाठत होती... आणि यासंबंधी तिच्या आई-वडिलांना याचा थांगपत्ताही नव्हता. एके दिवशी मनोजनं तिला आपल्या राहत असलेल्या ठिकाणी बोलावून घेतलं... रिया तिथं पोहचल्यावर मनोजनं तिच्यासोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. यानंतर प्रत्येक वेळेस मनोज तिच्याकडे तिच्या मैत्रिणींची माहिती आणि त्यांचे फोन नंबर मागू लागला.
यामुळे, चिडलेल्या रियानं त्याला लग्नाबद्दल विचारलं असता ‘आपण केवळ मजेसाठी केल्याचं’ मनोजनं तिला सांगितलं. मनोजनं केलेला हा खेळ रियाच्या जीवावर बेतला. मनोजनं लग्नसाठी दिलेल्या नकारानंतर रिया तणावाखाली होती... आणि शेवटी तीनं आत्महत्येचा मार्ग स्विकारला.
सुसाईड नोटमध्ये रियानं ‘मनोज मला टाळतोय म्हणून मी निराश झालेय. आम्ही केवळ दोन महिन्यांपूर्वी भेटलो आणि प्रेमात पडलो. मी त्याच्यासाठी सगळं काही सहन केलं. त्यानं माझ्याशी शारिरीक संबंधही प्रस्थापित केले... आणि आता तो म्हणतोय की मी सगळं काही फक्त मोजसाठी केलंय. तो माझ्यासोबत असं कसं करू शकतो? मला माझ्या आयुष्यात काहीही रस राहिलेला नाही’ असं लिहिलंय.
मुख्य म्हणजे याबाबतीत पोलिसांनी रियाच्या आई-वडिलांना विचारलं असता याबाबतीत आपल्याला यत्किंचितही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. ‘रिया काही दिवसांपासून तणावाखाली होती पण अभ्यासाची तिला भीती वाटत असेल असं आम्हाला वाटलं’ असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतलंय. त्याच्यावर बलात्कार आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप लावण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.