आसारामच्या मुलाविरुद्ध साक्ष देणाऱ्यावर गोळीबार

आसाराम बापूचा मुलगा नारायण साईच्या विरोधातला साक्षीदार महेंद्र चावला याच्यावर आज गोळीबार करण्यात आलाय. 

Updated: May 13, 2015, 01:17 PM IST
आसारामच्या मुलाविरुद्ध साक्ष देणाऱ्यावर गोळीबार title=

पानीपत : आसाराम बापूचा मुलगा नारायण साईच्या विरोधातला साक्षीदार महेंद्र चावला याच्यावर आज गोळीबार करण्यात आलाय. 

या गोळीबारात महेंद्र गंभीर जखमी झालाय. पानीपतमध्ये ही घटना घडलीय. 

जखमी झालेल्या महेंद्रला तात्काळ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. इथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


Caption

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या नारायण साईला १६ एप्रिल २०१५ रोजी गुजरात उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. आजारी आई लक्ष्मीबेन हरपलानी हिला भेटायचे असल्याचे कारण सांगून नारायण साईने जामीन मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता. सुरतच्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नारायण साईला अटक झालीय. डिसेंबर २०१३ पासून तो सुरतच्या तुरुंगात होता. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आसाराम बापूही तुरुंगात आहे.

आसाराम आणि त्याच्या मुलाविरुद्धच्या साक्षीदारांवर हल्ला होण्याची ही पाचवी घटना आहे.

१३ फेब्रुवारी २०१५
या अगोदरही, आसाराम विरुद्धच्या बलात्कार प्रकरणातील साक्षीदार राहुल साचेन याच्यावर सुरतमध्ये हल्ला झाला होता. सुरतच्या दोन बहिणींनी आसाराम आणि त्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप केलाय. याच प्रकरणात राहुल साक्षीदार होता.

११ जानेवारी, २०१५
त्याअगोदर, अखिल गुप्ता या साक्षीदारावरही मुझफ्फरनगरमध्ये हल्ला करण्यात आला. अखिवलवर केलेल्या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अखिल हा आसारामकडे जेवण बनवण्याचं आणि वैयक्तिक मदतनीस म्हणून काम करत होता.

१६ मार्च २०१४
दिनेश भावचंदानी हा आणखीन एक साक्षीदार अशाच एका जीवघेण्या हल्ल्याला बळी पडला. भावचंदानी याच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता.   

२३ मे २०१४
आसारामला मदतनीस म्हणून काम करणाऱ्या आणि नंतर साक्षीदार म्हणून उभ्या राहिलेल्या अमृत प्रजापती याच्यावर गेल्या वर्षी गुजरातमध्ये हल्ला करण्यात आला होता. गांधीनगर कोर्टासमोर त्यानं आसारामविरुद्ध आपली साक्ष  नोंदवली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.