कोलकाता: शीना बोरा हत्याप्रकरणात आतापर्यंत समोर न आलेले सिद्धार्थ दास आता पोलिसांसमोर आले आहेत. इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती आणि शीना आणि मिखाईलचे वडील अशी त्यांची ओळख...
पण सिद्धार्थ दास यांनी झी मीडियासोबत बोलतांना इंद्राणीसोबत लग्न न केल्याचा खुलासा केलाय. मात्र शीना आणि मिखाईल त्यांचीच मुलं असल्याचंही त्यांनी कबुल केलंय. कोलकाताच्या डमडम इथं पहिल्यांदा सिद्धार्थ दास बोलले आहेत.
आणखी वाचा - इंद्राणीने शीनाच्या नावाने राहुलला पाठवले होते पाच संदेश
गुवाहाटीमध्ये सिद्धार्थ दास आणि इंद्राणीची भेट झाली होती. दास यांनी कबुल केलंय ते इंद्राणीच्या म्हणजेच परी बोराच्या घरी तिच्या आईवडिलांसोबत राहायचा. त्यांना दोन मुलं झाली... १९८७मध्ये शीनाचा जन्म झाला तर १९८८मध्ये मिखाईलचा...
दास यांनी सांगितलं, १९८९मध्ये इंद्राणी अचानक बेपत्ता झाली. ती शिलाँगला तिचं काही काम पूर्ण करायला गेल्याचं कळलं, पण ती परत आलीच नाही. नंतर दास शिलाँगला तिच्यासाठी गेले, पण तिथं ती सापडली नाही. जेव्हा शिलाँगवरून दास गुवाहाटीला परतले तेव्हा तिच्या आई-वडिलांनी त्यांना घरात येवू दिलं नाही.
आणखी वाचा - इंद्राणी आणि पीटरच्या घरातून पोलिसांनी जप्त केली सुटकेस
त्यामुळं नंतर दास कोलकाताला राहायला गेले आणि तिथं त्यांनी आपलं नवं आयुष्य सुरू केलं. त्यांनी बबली दाससोबत दुसरं लग्न केलं. आता त्यांना १६ वर्षांचा एक मुलगा आहे.
शीना बोराच्या हत्येनंतर इंद्राणीच्या इतिहासाबद्दल पोलिसांना का सांगितलं नाही, असं विचारलं असता दास म्हणाले, तो त्याच्या कुटुंबियांसोबत आनंदी आहे, आपला भूतकाळ ते विसरले म्हणून समोर आले नाहीत.
शीना बोराची एप्रिल २०१२ला हत्या करण्यात आली. या प्रकरणात शीनाची आई इंद्राणी, इंद्राजीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम रायला अटक करण्यात आलीय. त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.