दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल आजपासून आणखी स्वस्त झालं आहे, पेट्रोल २ रूपये लीटर आणि डिझेल ५० पैसे प्रती लीटरने स्वस्त झालं आहे.
हे नवे दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खाली आल्या आहेत.
पेट्रोलची किंमत १५ जुलैपासून १ रूपया २७ पैशांनी खाली आली होती, तसेच डिझेलही १ रूपया १७ पैशांनी स्वस्त झालं आहे. मागील काही दिवसांपासून क्रूड ऑईलच्या किंमती सतत खाली येत होत्या.
मागील १५ दिवसांपासून क्रूड ऑईलच्या किंमती खाली आल्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर देखील दिसून आला आहे, अमेरिकन क्रूड ऑईलच्या किंमतीत कपात झाल्याने, अमेरिकन शेअर बाजारातही ऐतिहासिक घसरण दिसून आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.