कमी होता होता पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ?

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांना सरकारनं पुन्हा एक धक्का दिलाय. 

Updated: Nov 14, 2014, 07:54 AM IST
कमी होता होता पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ? title=

नवी दिल्ली : पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांना सरकारनं पुन्हा एक धक्का दिलाय. 

गुरुवारी दुपारी केंद्रीय सरकारनं पेट्रोल-डिझेलची एक्साइज ड्युटी (उत्पादन शुल्क) वाढवलीय. त्यामुळे, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत १.५० रुपये प्रती लीटर वाढ होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी, इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या सरकारी तेल कंपन्या किंमतींमध्ये कपात करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण, एक्साईज ड्युटी वाढल्यानं आपोआपचं पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होऊ शकते.

अनब्रांडेड डिझेलवर याअगोदर १.४६ रुपये एक्साईज ड्युटी होती. आता ती २.९६ पैसे करण्यात आलीय. तर ब्रांडेड डिझेलवर याअगोदर ३.७६ पैसे एक्साईज ड्युटी होती ती आता ५.२५ रुपये करण्यात आलीय. 

अनब्रांडेड पेट्रोलवर १.२० पैसे असणारी एक्साईज ड्युटी आता २.७० पैसे करण्यात आलीय. तर ब्रांडेड पेट्रोलवर २.३५ पैसे असणारी एक्साईज ड्युटी ३.८५ पैसे करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.