यंदाच्या वर्षी पीएफवर मिळणार ८.६५% व्याज

देशातल्या ४ कोटी इपीएफओ सदस्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिली आहे.

Updated: Apr 20, 2017, 05:25 PM IST
यंदाच्या वर्षी पीएफवर मिळणार ८.६५% व्याज  title=

नवी दिल्ली : देशातल्या ४ कोटी इपीएफओ सदस्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिली आहे. २०१६-१७ या वर्षासाठी पीएफवर ८.६५% व्याजदर मिळणार आहे. कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.

इपीएफओ धारकांना ८.६५% टक्के व्याजदर देण्यात यावा असा प्रस्ताव कामगार मंत्रालयानं अर्थमंत्रालयाला दिला होता. हा प्रस्ताव अर्थमंत्रालयानं स्वीकारला. पीएफवर एवढा व्याजदर द्यायला सुरुवातीला अर्थमंत्रालयाचा विरोध होता. छोट्या गुंतवणुकींवर जेवढा व्याजदर मिळतो तेवढाच पीएफवर देण्यात यावा असा आग्रह अर्थमंत्रालयाचा होता. पण अर्थमंत्रालयानं कामगार मंत्रालयाचा प्रस्तावित दर स्वीकारला. हा व्याजदर देण्यासाठी सरकारकडून कामगार मंत्रालयाला १५८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.