'ट्रिपल तलाक'वर मोहम्मद पैगंबरांनी काय म्हटलं होतं?

'ट्रिपल तलाक' हा सध्या धार्मिक रंग दिलेला वादाचा मुद्दा बनलाय. पण, मोहम्मद पैगंबरांनी 'ट्रिपल तलाक'बाबत नेमकं काय म्हटलं होतं? हे तुम्हाला माहीत आहे का?

Updated: Apr 20, 2017, 05:10 PM IST
'ट्रिपल तलाक'वर मोहम्मद पैगंबरांनी काय म्हटलं होतं? title=

मुंबई : 'ट्रिपल तलाक' हा सध्या धार्मिक रंग दिलेला वादाचा मुद्दा बनलाय. पण, मोहम्मद पैगंबरांनी 'ट्रिपल तलाक'बाबत नेमकं काय म्हटलं होतं? हे तुम्हाला माहीत आहे का?

'इंडियन एक्सप्रेस'मध्ये छापलेल्या माहितीनुसार, ट्रिपल तलाकबाबत पैगंबरांनी काहीही म्हटलेलं नाही. आपल्या सायीनुसार पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांनी याचा समावेश 'संस्कृती'च्या नावानं आचरणात आणला.

'तलाक' हा शब्द अरबी भाषेतून आलाय. या शब्दाचा अर्थ आहे 'एखाद्याला बंधनातून मुक्त करणं'... 'तलाका' म्हणडजेच 'मुक्तता' या शब्दातून 'तलाक' हा शब्द अस्तित्वात आला. 

जगभारत असे अनेक मुस्लिम देश आहेत जिथं 'ट्रिपल तलाक' पद्धत बंद करण्यात आलीय. या देशांमध्ये पाकिस्तानसोबतच बांग्लादेश, तुर्की, इजिप्त, ट्युनिशिया, अल्जेरिया, श्रीलंका यांचा समावेश आहे. 

इस्लामच्या जानकारांच्या म्हणण्यानुसार, इस्लामिक कायद्यात केवळ दोन पद्धतीचे तलाक मान्य आहेत. तलाक अल सुन्ना (जो पैगंबर मोहम्मद यांच्या हुकूमानुसार मान्य करण्यात आलाय) तर दुसरा आहे तलाक अल बिदल (जो पैंगबरांच्या कठिण हुकूम आचरणात आणण्यात अडचणी येत असल्यानं सुरू केला गेला)... त्यानंतर त्यांना दोन वेगवेगळ्या पद्धतीत विभाजित करण्यात आलं.

पहिल्या पद्धतीत तीन वेळ तलाक म्हणत 'तलाक' दिला जातो तर दुसऱ्या पद्धतीत 'लिखित तलाक' दिला जातो. जानकारांच्या म्हणण्यानुसार, ट्रिपल तलाक हा खरा तर इस्लाम अनुसार नाही... तर हा 'तलाक'च्या कठिण नियमांना फाटा देण्यासाठी दुसऱ्या शतकात ओमयाद शासकांकडून याची सुरुवात करण्यात आली.