नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. गोवा (40 जागांसाठी) आणि पंजाबमध्ये (117 जागांसाठी) चार फेब्रुवारी रोजी मतदान होईल. उत्तराखंडमध्ये (70 जागांसाठी) एकाच टप्प्यात निवडणुका होतील आणि 15 फेब्रुवारीला मतदान होईल. मणिपूरमध्ये (60 जागांसाठी) दोन टप्प्यांत निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यातील मतदान 4 मार्च आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 8 मार्च रोजी होईल.... तर उत्तरप्रदेशात सात टप्प्यांत निवडणुका होतील. पाचही राज्यांतील मतदानाचा निकाल 11 मार्च रोजी जाहीर होईल.
- पाच राज्यांत होणार निवडणुका
- उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये होणार निवडणुका
- उत्तर प्रदेशात 15 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 11 फेब्रुवारीला होणार
- दुसऱ्या टप्प्याचं मतदान 15 फेब्रुवारी - 73 जागांसाठी
- तिसऱ्या टप्प्याचं मतदान 19 फेब्रुवारी - 67 जागांसाठी
- चौथ्या टप्प्याचं मतदान 23 फेब्रुवारी - 69 जागांसाठी
- पाचव्या टप्प्याचं मतदान 27 फेब्रुवारी
- सहाव्या टप्प्याचं मतदान 4 मार्च
- सातव्या टप्प्याचं मतदान 7 मार्च
- मणिपूरमध्ये 38 जागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान
- मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 4 मार्च तर दूसऱ्या टप्प्यातील मतदान 8 मार्चला होणार
- गोवा आणि पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीला होणार मतदान
- पाच राज्यांमध्ये 16 कोटी मतदार
- एकूण ६९० विधानसभा जागांसाठी होणार मतदान
- पाचही राज्यांत आचारसंहिता लागू
- 5 राज्यांमध्ये एकूण 1,85,000 पोलिंग स्टेशन बनवणार
- बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा उमेदवाराचा फोटोदेखील असणार
- दिव्यांगांसाठी वेगळी यंत्रणा उभारणार - निवडणूक आयोग
- काही जागी महिलांसाठी वेगळे पोलिंग बूथ असणार
- मतदारांना रंगीत मतदान गाईड दिले जाईल
- प्रत्येक मतदान केंद्रावर चार पोस्टर लावले जातील
- पोलिंग स्टेशनवर व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध असेल
- उमेदवारांना नो डिमांड सर्टिफिकेट देणं गरजेचं
- आपल्याकडे परदेशी नागरिकत्व नाही हे उमेदवारांना जाहीर करावं लागेल
- यूपी, पंजाब, उत्तराखंडमध्ये उमेदवार 28 लाखांपर्यंत निवडणूकीत खर्च करू शकतात
- गोवा-मणिपूरमध्ये उमेदवार 20 लाखांपर्यंत निवडणुकीत खर्च करू शकतात
- उमेदवारांना आपलं बँक अकाऊंट सूरू करावं लागेल
- उमेदवारांना 20 हजारांपेक्षा जास्त पैशांची देवाण-घेवाण चेकनं करावी लागणार
- 20 हजारांपेक्षा जास्त मदत चेकनंच घ्यावी लागेल
- पेड न्यूजवर खास नजर राहील
- उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी 7 टप्प्यांमध्ये होणार निवडणुका
- मणिपूरमध्ये 38 जागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान
- गोवा आणि पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीला होणार मतदान