ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांवर रॅलीदरम्यान फेकलं अंड

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर अंडं फेंकण्याची घटना

Updated: Oct 26, 2016, 03:20 PM IST
ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांवर रॅलीदरम्यान फेकलं अंड title=

ओडिशा : मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर एका युवकाने रॅलीदरम्यान अंडं फेंकण्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री पटनायक मयूरभंज जिल्ह्यात रॅली करतांना स्टेजवर उपस्थित होते. यादरम्यान एका युवकाने त्यांच्यावर अंड फेकलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

पटनायक यांच्यावर अंडं फेकणारा तरुण हा काँग्रेसच्या विद्यार्थी विंगचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. या युवकाची पोलीस चौकशी करत आहेत. भाषण सुरु होत असतांनाच त्यांच्यावर या युवकाने अंड फेकलं त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पाहा व्हिडिओ