बंगळुरू : 40 कोटी रुपयांच्या खाण लाचखोरी प्रकरणात अडकलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.
भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने येडियुरप्पा यांच्यासोबत त्यांचे दोन मुलगे, जावई आणि जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांनाही सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले.
खाणकामांना परवानगी देण्यासाठी लाच स्वीकारल्याचे आरोप येडियुरप्पांवर करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2011 मध्ये त्यांची रवानगी बंगळुरूतील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. मात्र तीन आठवड्यांमध्येच त्यांची जामीनावर मुक्तता झाली होती.