मोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण

देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Updated: May 6, 2017, 02:16 PM IST
मोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण title=

मुंबई : देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म वादनगरमध्ये १७ सप्टेंबर १९५० मध्ये झाला. वादनगरमध्येच त्यांची त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभ्यासात खूप असे हुशार नव्हते. पण त्यांना डिबेट आणि थेएटरची त्यांना विशेष आवड होती. १९७८ मध्ये त्यांनी दिल्ली यूनिवर्सिटीच्या डिस्टेंस एजुकेशनमधून पॉलिटिकल साईंसमध्ये ग्रॅजुएशन केलं. ५ वर्षानंतर गुजरात यूनिवर्सिटीमधून त्यांनी 1982 मध्ये पॉलिटिकल साईंसमध्ये मास्टर डिग्री घेतली.

अमित शाह

अमित शाह नरेंद्र मोदींचे सगळ्यात जवळचे मानले जातात. भाजपा अध्यक्ष अमित शाह पॉलिटिकल लाईफमध्ये सध्या सर्वात यशस्वी आहेत. पण तुम्हाला माहित नसेल की अमित शाह हे आधी बँकेत काम करायचे. अमित शाह यांचे वडील अनिलचंद्र शाह हे बिजनेस करायचे. अमित शाह यांनी मेहसानामध्ये शालेय शिक्षण घेतलं. मग बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी ग्रॅजुएशन केलं. बायोकेमिस्ट्रीमध्ये बी.एससी केल्यानंतर अमित शाह यांनी वडिलांचा बिझनेस ज्वाईन केला. तर काही दिवस स्टॉक ब्रोकर म्हणून देखील त्यांनी काम केलं. अहमदाबादच्या को-ओपरेटीव्ह बँकेत मग त्यांनी नोकरी केली. 

अरुण जेटली

देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे देशातील काही शिक्षित नेत्यांमध्ये जाणले जातात. अरुण जेटली यांची निर्णय क्षमता आणि अर्थशास्त्राबाबत असलेलं ज्ञान पाहता त्यांना हे खातं दिलं गेलं असेल. देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली दिल्ली हायकोर्टचे वरिष्ठ वकील आहेत. त्यांनी सुरुवातीचं शिक्षण दिल्लीच्या सेंट जेवियर्स शाळेमध्ये घेतलं. दिल्लीतील प्रसिद्ध कॉलेज श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी ग्रॅजुएट पूर्ण केलं. अरुण जेटलींनी दिल्ली यूनिवर्सिटीतून 1977 मध्ये लॉची डिग्री घेतली. कॉलेजच्या दिवसांमध्ये जेटली कॉलेजते प्रेसिडेंट देखील होते. वाद-विवादात भाग घेणं. क्रिकेट खेळणे आणि अभ्यास करणे जेटलींना आवडायचं. अरुण जेटलींच्या कुटुंबात अनेक जण वकील आहेत. त्यांचे पिता महाराज किशन जेटली हे देखील वकील होते.

योगी आदित्यनाथ 

सध्या देशात चर्चेत असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवे वस्त्र धारण करत असले तरी तुम्हाला वाटत असेल की त्यांनी काही मोठं शिक्षण घेतलं असेल का? ईश्वरावर खूप विश्वास ठेवणारे आणि हिंदूत्वाबाबत बोलणारे योगी अभ्यासात खूप हुशार होते. गणितामध्ये डिग्री घेणाऱ्या योगींनी नंतर स्ट्रीम बदलं. राजकारणात त्यांचं वजन वाढलं आहे, योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ मध्ये उत्तराखंडमध्ये एका छोट्या गावात झाला. गढवाल यूनिवर्सिटीमधून त्यांनी गणित विषयासह बीएससीमध्ये डिग्री घेतली. अजय सिंह बिष्ट हे त्यांचं खरं नाव. हुशार विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं नाव असायचं. योगी खूप चांगले वक्ते होते. त्यामुळे ते जाणले जायचे.

सुषमा स्वराज

भारतीय जनता पक्षाच्या एक वरिष्ठ नेत्या आणि देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ मध्ये झाला. २५ वर्षाच्या वयात त्यांनी हरियाणा सरकारमध्ये सगळ्यात कमी वयात कॅबिनेट मंत्रीपद भुषवलं. सुषमा स्वराज यांनी राजकारणात येण्यापूर्वी लॉचा अभ्यास पूर्ण केला होता आणि सुप्रीम कोर्टात ते वकील म्हणून प्रॅक्ट‍िस करायच्या. अम्बालाच्या एसडी कॉलेजमधून संस्कृत आणि पॉलिटिकल साईंसमध्ये त्यांनी बीएची डिग्री घेतली. मग पंजाब यूनिवर्सिटीमध्ये LL.B केलं. हरियाणा भाषा विभागाद्वारे राज्यस्तरीय स्पर्धेत सुषमा स्वराज यांनी  लगातार तीन वर्ष बेस्ट हिंदी स्पीकर म्हणून मान पटकवला. सुषमा स्वराज एक चांगल्या वक्ता म्हणून जाणल्या जातात.