सावधान! जीवघेणा इबोला भारतामध्ये? चेन्नईत पहिला संशयित रुग्ण

संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संयशित भारतातही सापडल्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये सापडलेल्या या संशयित रूग्णाला चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.  

Updated: Aug 10, 2014, 02:37 PM IST
 सावधान! जीवघेणा इबोला भारतामध्ये? चेन्नईत पहिला संशयित रुग्ण  title=

चेन्नई/नवी दिल्ली/मुंबई: संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संयशित भारतातही सापडल्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये सापडलेल्या या संशयित रूग्णाला चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. हा संशयित भारतीय न्यू गिनी देशातून आला असून, या नागरिकाला इबोलाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या रूग्णाची तपासणी सध्या सुरू आहे.

दरम्यान, इबोला या रोगासंदर्भात संयुक्त राष्ट्र आरोग्य संघटनेतर्फेही हाय अलर्ट जारी केला आहे. या रोगाचा सर्वात जास्त प्रादूर्भाव हा अफ्रिका खंडातील देशात आढळून आला आहे. पश्चिम आफ्रिकन देश गिनी, सियरा लियॉन आणि लाइबेरियामध्ये इबोला व्हायरसचा वाढता धोका बघता जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे. 

पश्चिम आफ्रिकन राष्ट्र इबोला व्हायरसमुळं आजपर्यंतच्या सगळ्यात वाईट काळातून जात आहे. हा व्हायरस संपू्र्ण जगात पसरणार तर नाही ना, अशी भीती आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. इबोला व्हायरसच्या धोक्यामुळं अमेरिका देखील चिंतेत आहे. हा व्हायरस नियंत्रणाबाहेर जात असून अन्य राष्ट्रांमध्ये देखील पसरू शकतो अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय. 

इबोलाबाधित ९० टक्के रुग्ण दगावतात. इबोला या रोगावर कोणताही अधिकृत उपचार किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळं या देशांमध्ये भयभितता पसरली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, इबोलाचा पहिला रूग्ण मार्चमध्ये आढळला. या रोगामुळे आतापर्यंत 1,711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, भारतात इबोला व्हायरस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भारतात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केलाय. शिवाय काही हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलेत. 

हेल्पलाईन नंबर - 

  • 011-23063205,

  •     23061469 आणि 

  •     23061302

  •  तर मुंबई एअरपोर्टवरविशेष अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलीय.

  •  बीएमसी मेडिकल हॉस्पिटलमध्ये 10-10 बेड आरक्षित करण्यात आलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.