नवी दिल्ली : 20 वर्षांपूर्वी भारत सरकारनं एक रुपयांची नोट पूर्णत: बंद केली होती. आता पुन्हा एकदा या नोटांची छपाई सुरू करण्यात येतेय. या एक रुपयांच्या नोटांची किंमत एकच रुपया असली तरीही एका ऑनलाईन वेबसाईटवर 'एक रुपयाच्या' नोटेचं मूल्य तब्बल सात लाख रुपये निर्धारित करण्यात आलंय.
होय, हे खरं आहे... ई-शॉपिंग वेबसाईट 'ईबे'वर एक रुपयाची नोट सात लाख रुपयांना विकण्यासाठी ठेवण्यात आीलय. या नोटेचं वैशिष्ट्यं म्हणजे, ही नोट स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. या काळातील ही एकमेव नोट असल्याचं सांगण्यात येतंय. या नोटेवर तत्कालीन गव्हर्नर जे. डब्ल्यू. केली यांचे हस्ताक्षर आहेत. 80 वर्षांपूर्वीची ही नोट ब्रिटिश इंडियाकडून 1935 मध्ये जाहीर करण्यात आली होती.
या वेबसाईटवर ही काही एकच नोट विकण्यासाठी ठेवण्यात आलेली नाही तर वेगवेगळ्या वर्षांतील अनेक एक रुपयांच्या नोटा इथं विक्रिसाठी उपलब्ध आहेत... तुम्ही तुमच्या पसंतीनुसार त्यांची निवड करू शकता. वेगवेगळ्या वेळेतील नोटासाठी तुम्हाला वेगवेगळी किंमत द्यावी लागेल.
म्हणजेच, 1949 सालातील 'एक रुपयाच्या' नोटेसाठी तुम्हाला 6 हजार रुपये द्यावे लागतील. तर 1966 सालातील एक रुपयाची नोट 45 रुपयांनाही उपलब्ध आहे. 1949, 1957 आणि 1964 सालातील 59 नोटांचं बंडल 34,999 रुपयांना उपलब्ध आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.