चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अॅटॅक आला अन्...

शहरातील एका गजबजलेल्या रस्त्यावर चालत्या बसमध्ये एका बस चालकाला अचानक हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला... आणि काही काळ अनेकांचे श्वास रोखले गेले.  

Updated: Jan 23, 2015, 02:52 PM IST
चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अॅटॅक आला अन्... title=

चेन्नई : शहरातील एका गजबजलेल्या रस्त्यावर चालत्या बसमध्ये एका बस चालकाला अचानक हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला... आणि काही काळ अनेकांचे श्वास रोखले गेले.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी रोडवर एका चालत्या बसमध्ये ही घटना घडली. ३१ वर्षांचे बसचालक ए. आनंदन यांना उपनगरीय तांबरम भागातील एका हॉस्पीटलजवळ अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का जाणवला. पण, प्रसंगावधान राखून त्यांनी गाडी हळू केली... आणि जवळच रस्त्यावर थांबवली. यानंतर काही क्षणातच त्यांची शुद्ध हरपली.

आनंदन यांना उपस्थितांनी हॉस्पीटलमध्ये हलवलं... पण, इथे पोहचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. होती. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, बस थांबवतानाच आनंदन यांनी आपला प्राण सोडला होता.

बसमध्ये एका खाजगी कंपनीचे कर्मचारी प्रवास करत होते. आनंदन यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.