नवी दिल्ली : एस्सेल ग्रुपचे चेअरमन आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी आज खासदार म्हणून प्राप्त झालेले संपूर्ण मानधन पंतप्रधान मदतनिधीला सूपूर्द केले आहे.
या शिवाय यापुढे भविष्यात खासदार म्हणून मिळणारा पगारातून केवळ १ रुपया घेणार असून उरलेला पगार पंतप्रधान मदतनिधीत दान करण्यात येईल अशी ही घोषणा डॉ. चंद्रा यांनी यावेळी केली.
डॉ. सुभाष चंद्रा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच यावेळी आपल्या वेतनाचा चेक पंतप्रधानांना सोपवला. देशातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या डॉ. सुभाष चंद्रा यांनी डीएससी फाऊंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून सामाजिक आणि धर्मार्थ काम सुरू केले आहे.
Donated 100% of my parliament salary to PM relief fund. Gave cheque today to Modi ji personally, will take only 1 rupee/month in future
— Dr. Subhash Chandra (@subhashchandra) March 24, 2017
डॉ. चंद्रा आपल्या हिंमतीवर यशस्वी होणाऱ्या काही व्यक्तींपैकी एक आहेत. हरियाणातील हिसार जिल्ह्यातील मंडी आदमपूर या एका छोट्याशा गावातून वयाच्या २० व्या वर्षी दिल्लीला व्यवसायासाठी आले होते. तेव्हा त्यांच्या खिशात केवळ १७ रुपये होते. आज आपल्या मेहनत आणि सचोटीमुळे डॉ. चंद्रा मीडिया आणि मनोरंजन जगतातील प्रमुख व्यक्तींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
Gave the cheque to @PMOIndia Shri @narendramodi ji pic.twitter.com/mfJC8OGKrM
— Dr. Subhash Chandra (@subhashchandra) March 24, 2017