www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सातत्यानं झटणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आज मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आजडॉ. दाभोलकरांची कन्या मुक्त दाभोलकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. आयुष्यभर अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा-रूढींविरोधात लढा देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कार्याला पद्मश्री पुरस्काराच्या रूपाने आदराची पावती मिळाली आहे.
पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विज्ञान सल्लागार समित्यांचे सदस्य राहिलेले डॉ. रघुनाथ माशेलकर हे केंद्र सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परीषदेचे (सीएसआयआर) महासंचालकही होते. याआधी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. माशेलकर यांच्यासह महाराष्ट्रातील २१ जणांचा पद्मविजेत्यांच्या यादीत समावेश आहे. या बी.के.एस अय्यंगार यांना पद्म विभूषण, लिअँडर पेसला पद्मभूषण आणि अंजूम चोप्रा हिला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.