घरगुती सिलिंडर गॅसचे दर पुन्हा वाढणार !

घरगुती सिलिंडर गॅसचे दर पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. दर निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आलेय. त्यामुळे ही समिती नवे दर लागू करील. या समितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. या अहवालावर विचारविनिमिय करून येत्या ३० सप्टेंबर रोजी गॅसच्या सुधारित दरांची घोषणा मोदी सरकार करण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 11, 2014, 09:49 AM IST
घरगुती सिलिंडर गॅसचे दर पुन्हा वाढणार ! title=

नवी दिल्ली : घरगुती सिलिंडर गॅसचे दर पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. दर निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आलेय. त्यामुळे ही समिती नवे दर लागू करील. या समितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. या अहवालावर विचारविनिमिय करून येत्या ३० सप्टेंबर रोजी गॅसच्या सुधारित दरांची घोषणा मोदी सरकार करण्याची शक्यता आहे.

सिलिंडर गॅस दरवाढ दुप्पट नसली तरी ती दीडपट तरी असेल. त्यामुळे गॅस दरात वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या दरवाढीमुळे आणखी महागाईत वाढ होईल. पंतप्रधान नरेंद्री मोदी सरकार आता हे आव्हान कसे पेलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे ही दरवाढ त्यांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते गॅसच्या किमतींचा संबंध थेट अमेरिकी डॉलर आणि सरकारी खात्यातील वित्तीय तुटीशी निगडीत असल्याने नवी समिती नेमली असली तरी दरवाढ अपरिहार्य आहे. गॅसच्या किमतीतील अस्थिरतेचा फटका प्रामुख्याने सीएनजी, वीज आणि खते या तीन घटकांना बसतो. 

वीज निर्मितीत प्रति युनिट ४५ पैशांची वाढ होते. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो ही वाढ दोन रुपये ८१ पैशांपर्यंत आहे. तर पाईपगॅससाठी ही दरवाढ एक रुपया ८९ पैशांची होऊ शकेल, अशी शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.