विधानसभा निवडणुका योग कधी, तीन मुहूर्त ?

 महाराष्ट्रासहीत चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र  निराशा झाल्यानंतर अजूनही ‘योग’ काही सापडलेला नाही. केवळ बैठकांवर होत आहेत. त्यामुळे आचारसंहिता कधी लागणार याबाबत तर्क लढविले जात असून अनेक नेते मंडळी संभ्रमनात  आहेत. मुहूर्त १२, १५ ,१८ सप्टेंबरचा असू शकेल असे म्हटले जात आहे.

Updated: Sep 11, 2014, 08:39 AM IST
विधानसभा निवडणुका योग कधी, तीन मुहूर्त ? title=

नवी दिल्ली :  महाराष्ट्रासहीत चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र  निराशा झाल्यानंतर अजूनही ‘योग’ काही सापडलेला नाही. केवळ बैठकांवर होत आहेत. त्यामुळे आचारसंहिता कधी लागणार याबाबत तर्क लढविले जात असून अनेक नेते मंडळी संभ्रमनात  आहेत. मुहूर्त १२, १५ ,१८ सप्टेंबरचा असू शकेल असे म्हटले जात आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लांबत चालल्याने राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवार हवालदिल झाले आहेत. गणेशोत्सवाची सांगता होताच निवडणूक आयोगाने आधी ९ सप्टेंबरचा मुहूर्त काढला होता. या दिवशी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असल्याचे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून फिरत होते, परंतु दिवसभर वाट पाहूनही निवडणूक आयोगाने कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे १० सप्टेंबरला निवडणुकीची घोषणा नक्की होईल याची उमेदवारांसह सार्‍यांनाच खात्री होती, परंतु हा अंदाजही फोल ठरला. 

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत हे सध्या नवी दिल्ली बाहेर आहेत. ते परतल्यानंतर अन्य दोन आयुक्त एच. एस. ब्रह्मा आणि डॉ. नसीम झैदी यांच्याशी त्यांची निवडणुकांबाबत चर्चा होऊन त्यानंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, अशी अटक आता बांधण्यात येत आहे.

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-कश्मीर या चार राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ होत आहेत. मात्र, जम्मू-कश्मीरमधील महाप्रलयामुळे तेथील विधानसभा निवडणुकीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. पण निवडणूक आयोग आधी हरियाणा आणि नंतर महाराष्ट्रातील मतदानाच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.

मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याबाबत प्रसारमाध्यमांना तपशीलवार सूचना देण्यात आल्याने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील असेच सगळ्यांनी गृहीत धरले होते पण त्या दिवशी आयोगाने निवडणुकांची घोषणा टाळली होती.  

मुहूर्त १२, १५ ,१८ सप्टेंबरचा?

देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचा मुहूर्त १२ सप्टेंबर, १५ सप्टेंबर किंवा १८ सप्टेंबरला असू अखेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक तारखांची घोषणा याच तारखेला होईल असा अनेकांचा होरा आहे. १८ सप्टेंबरला गुरुपुष्यामृत मुहूर्त  असल्याने याच दिवशी निवडणुकांची घोषणा होऊ शकेल, असे बोलले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.