नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने पहिले बजेटमध्ये पायाभूत विकासावर भर दिला आहे. त्यामुळे नव्या नोकऱ्यांमध्ये बंपर वाढ होणार आहे. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार ५० लाख ते १ कोटी नव्या नोकऱ्या येत्या ३-४ वर्षांमध्ये निर्माण होतील.
सरकारने बजेटमध्ये अनेक क्षेत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूक (एफडीआय) ला परवानगी दिली आहे. त्यामुळे नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील. एफडीआयमुळे विमा, संरक्षण, मुलभूत सेवा सुविधा, बांधकाम आणि कृषि क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार आहे. रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योगाच्या अंदाजानुसार यातील अधिक नोकऱ्या या फ्रेशर्ससाठी असणार आहे. त्यामुळे खालच्या स्तरातील व्यक्तींसाठी अधिक नोकऱ्या असणार आहेत.
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एफडीआयमुळे सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तसेच विमा क्षेत्रात एफडीआयची मर्यादा वाढली तर एन्ट्री लेवलमध्ये नोकऱ्यांची संधी अधिक आहे.
बजेटनुसार पुढील ३-४वर्षांच्या कालावधीत जीडीपी ७-८ टक्क्यांवर येईल, तसे झाले तर सुमारे एक कोटी नोकऱ्या वाढणे सहज शक्य होईल. बजेटमध्ये आयआयटी आणि आयआयएमसाठी ५०० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हाय स्किल्ड एम्प्लॉयीची कमतरता कमी होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.