नवी दिल्ली : दिल्ली भाजपच्या कार्यालयात काल दुपारी जोरदार हंगामा झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून भाजपनं प्रोजेक्ट करायचं ठरवलंय. त्यामुळं भाजप नेते सतीश उपाध्याय यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले असून, त्यांनी भाजप कार्यालयात गोंधळ घातला.
पॅराशूट सीएम नही चलेगी, अशा घोषणांनी भाजप ऑफिस दणाणून गेलं. मुख्यमंत्रीपदावरून भाजपमध्ये पक्षांतर्गत वादावादीला कशी सुरू आहे, याचं चित्र यानिमित्तानं दिसलं. भाजपने दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली.
किरण बेदी या दिल्लीच्या कृष्णानगरमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती शाह यांनी योवळी दिली. आज भाजपची निवडणूक समितीची बैठकीत पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
मात्र दुसरीकडे एका सर्चमध्ये अरविंद केजरीवाल यांना अजूनही दिल्लीत सर्वाधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे. अरविंद केजरीवाल यांना थोपवण्यासाठी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.