सावधान, या नंबरवरून आला फोन तर लागू शकतो चुना

तुम्हांला +३७१ आणि + ३७५ देशाच्या कोडवरून मिसकॉल आला आणि तुम्ही त्याला कॉलबॅक केला. तर काही सेकंदात तुमच्या मोबाइलमधून ५० ते २०० रुपये कट होऊ शकतात. 

Updated: Jan 5, 2015, 05:29 PM IST
सावधान, या नंबरवरून आला फोन तर लागू शकतो चुना title=

जयपूर : तुम्हांला +३७१ आणि + ३७५ देशाच्या कोडवरून मिसकॉल आला आणि तुम्ही त्याला कॉलबॅक केला. तर काही सेकंदात तुमच्या मोबाइलमधून ५० ते २०० रुपये कट होऊ शकतात. 

जयपूरकर बेलारूसच्या कंट्री कोड +३७५ आणि लातवियाचा कंट्री कोड + ३७१वरून मिसकॉल येत आहेत. या क्रमांकावर कॉल केल्यावर एक रेकॉर्डेड कॉल असल्याचा आवाज येतो. हा आवाज तुम्हांला फटका बसू शकतो. तुम्ही जितके ऐकण्याचा प्रयत्न कराल तितका तुमचा बॅलेन्स जलद गतीने संपतो. पोस्ट पेड असल्यास महिन्याच्या शेवटी तुम्हांला भले मोठे बील येऊ शकते. 

हा एकप्रकारचा इंटरनॅशनल फ्रॉड आहे. यामुळे अनेक देशातील मोबाईल युजर्स हैराण आहेत. काही वर्षांपूर्वी देशातील इतर शहरातील मोबाईल युजर्सला अशा प्रकारे इंटरनॅशनल कोडच्या नंबरवरून मिसकॉल आले होते. त्यावेळी एका मोबाईल ऑपरेटरने अशा नंबर्सवर कॉल बॅक न करण्याचा सल्ला दिला होता. 

हा फ्रॉड करणारी एक इंटरनॅशनल गँग आहे. ते काही प्रिमिअर नंबर खरेदी करून धोका देतात. अशा नंबर्सवर कॉ़ल आल्यास त्याचे काही पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतात. 

देशात अशा प्रकारे चिटींग करण्याची नवी पद्धत आहे. अशा प्रकारे मिसकॉलवर कॉल बॅक केल्यावर वेगवेगळे चार्ज वेगवेगळे ऑपरेट लावतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.