नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची दिवाळी पूरग्रस्त काश्मीरच्या जनतेसोबत साजरी करणार आहेत. मोदींनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिलीय.
पुरामुळे काश्मीरमधील ४०० गावं पूर्णपणे उध्वस्त झाली असून लाखो लोक अजूनही बेघर आहेत. काश्मीरच्या जनतेच्या दु:खात आपण सहभागी असून त्यांचं दु:ख दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.
Will be in Srinagar on Diwali, 23rd October & will spend the day with our sisters & brothers affected by the unfortunate floods.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2014
आज सकाळी १० वाजता मोदी गव्हर्नर हाऊसमध्ये पोहोचतील. त्यानंतर पंतप्रधान राजबाग आणि जवाहरनगर या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.