फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

हरियाणामध्ये फरीदाबादच्या एनआयटी दसरा मैदानात सजलेल्या फटाक्यांच्या बाजारात मंगळवारी सायंकाळा अचानक आग लागली... या आगीत 100 हून अधिक दुकानं जळून खाक झालीत...

Updated: Oct 21, 2014, 08:28 PM IST
फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही title=

फरीदाबाद : हरियाणामध्ये फरीदाबादच्या एनआयटी दसरा मैदानात सजलेल्या फटाक्यांच्या बाजारात मंगळवारी सायंकाळा अचानक आग लागली... या आगीत 100 हून अधिक दुकानं जळून खाक झालीत...

फटाक्यांचा बाजार भरलेला असल्यानं आगीचा जोरदार भडका उडालेला दिसला. अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्यात.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, या आगीत काही जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही आग भडकली. एका जोरदार आवाजासहीत एका फटाक्यांच्या दुकानात स्फोट झाला आणि पाहता पाहताच संपूर्ण बाजारानंच पेट घेतला. या ठिकाणी अजूनही लोकांना आगीच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात येतंय.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.