काल युद्ध सेवा पदक, आज कर्नल एम. एन. रॉय शहीद

 जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे एका घरात लपून बसलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत युद्ध सेवा पदक विजेते कर्नल एम एन राय शहीद झाले.

Updated: Jan 27, 2015, 10:06 PM IST
काल युद्ध सेवा पदक, आज कर्नल एम. एन. रॉय शहीद title=

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे एका घरात लपून बसलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत युद्ध सेवा पदक विजेते कर्नल एम एन राय शहीद झाले.

ते राष्ट्रीय रायफलच्या एका तुकडीचे कमांडिंग ऑफिसर म्हणून चकमकीत सुरक्षा पथकाचे नेतृत्व करत होते. याच चकमकीत पोलिस दलाचे एक हेड कॉन्स्टेबलही शहीद झाले. सुरक्षा पथकाने घराला घेराव घालून अखेर दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले.

कर्नल मुनींद्र नाथ राय यांना सोमवारी प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदकाने गौरविण्यात आले होते. पदक विजेत्या लष्करी अधिका-याला प्रजासत्ताक दिनाच्या दुस-याच दिवशी वीरमरण येण्याची ही अत्यंत दुर्मिळ अशी घटना आहे. पुलवामा येथे एका निवासी वसाहतीत दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकाने घटनास्थळी कारवाई सुरू केली.

या कारवाई दरम्यान हिजबुल मुजाहिदीनचे आदिल खान आणि शिराझ दार हे दहशतवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी आदिल खान हा मिंदोरा येथील रहिवासी होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.