नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुढील तीन आठवड्यात सुधारेल. ५०० रुपयांच्या नव्या नोटा मोठ्या प्रमाणात छापण्यात येत आहेत. त्यामुळे ३० डिसेंबरनंतर नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर देशभरात निर्माण झालेली चलन टंचाई दूर करण्यासाठी युद्धपातळीपर प्रयत्न सुरू आहेत. ३० डिसेंबरपर्यंत ५० टक्के चलन बाजारात येईल. ५०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापण्यात येत आहे. या नोटांची वाहतूक विमानाने करण्यात येणार असल्याचे ते म्हणालेत.
नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनटंचाईमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना किमान नव्या वर्षात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दास यांनी चलन टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जप्त केलेल्या नव्या नोटा पुन्हा बाजारात आणल्या जात आहेत. ५०० रुपयांच्या नोटा छपाईचा वेगही वाढवण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यात ५०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा सुरळीत केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
17:13 PM
नवी दिल्ली : पुढील तीन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही - शक्तिकांत दास
17:11 PM
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सरकारचे पुरेपूर प्रयत्न, सहकारी बँकाँना करण्यात येणाऱ्या चलन पुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे - शक्तिकांत दास
17:06 PM
नवी दिल्ली : नव्या नोटांचे डिझाईन भारतात तयार, नव्या ५०० रुपयांच्या नोटांची छपाई वाढवली, देशभरात नोटा पोहोचवण्यासाठी विमानांचा वापर - शक्तिकांत दास
17:06 PM
नवी दिल्ली : ८ नोव्हेंबरपर्यंत १०० रुपयांच्या १ लाख ६० हजारांच्या नोटा बाजारात होत्या, ८० हजार कोटींच्या नव्या नोटा छापण्यात आल्या आहेत- शक्तिकांत दास