दिल्लीत वाहतुकीचे नियम अधिक कडक

दिल्लीच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणं आता चांगलंच महाग पडू शकतं. वाहतुकीचे नियम तोडल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं.

Updated: Dec 15, 2015, 10:48 PM IST
दिल्लीत वाहतुकीचे नियम अधिक कडक title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणं आता चांगलंच महाग पडू शकतं. वाहतुकीचे नियम तोडल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं.

दारुसेवन करुन वाहन चालवणंही चालकांच्या अंगाशी येऊ शकतं. मद्यसेवन करुन गाडी चालवणा-याला 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हे सगळे नियम दिल्लीत आजपासून लागू होत आहेत. 

सुप्रीम कोर्टाच्या रस्ते सुरक्षा समितीनं ट्रॅफिक नियमांबाबत हे कडक निर्देश दिले आहेत. या निर्देशांचं काटेकोरपणे पालन करण्याचं दिल्ली वाहतूक पोलिसांनी ठरवलं आहे.