नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या दिल्ली दौऱ्यात मुंबईच्या कोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात काढू, असं आश्वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलंय. आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकास कामांच्या मंजुरीबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, व्यंकैया नायडू आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंची भेट घेतली आणि चर्चा केली.
यावेळी मुंबईहून नाशिक, भुसावळ मध्यप्रदेश मार्गे राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शिवाय महाराष्ट्रतले रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. त्यात गडचिरोली, परळी रेल्वे मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न होणार आहे.तर पुणे मेट्रो संदर्भात आगामी १५ नोव्हेंबरपर्यंत निर्णयाचं आश्वासन व्यंकय्या नायडूनी दिलंय.
तसेच पुण्यातील मेट्रो प्रकल्प मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिलाय. त्यामुळे दिल्लीची भेट महाराष्ट्रासाठी फलदायी ठरणार की नाही, याची उत्सुकता लागलेय. दरम्यान, १५ दिवसानंतर याबाबत अधिक स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.