'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का'

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या राजनैतिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. 1977 आणि 1980 दरम्यान, आपल्या राजनैतिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर मात्र त्यांनी राजनिती सोडून व्यवसाय-धंदा सुरू करण्याचा विचार पक्का केला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. 

Updated: Nov 8, 2015, 10:06 AM IST
'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का' title=

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या राजनैतिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. 1977 आणि 1980 दरम्यान, आपल्या राजनैतिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर मात्र त्यांनी राजनिती सोडून व्यवसाय-धंदा सुरू करण्याचा विचार पक्का केला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. 

पत्रकार संतोष सिंह यांनी लिहिलेल्या 'रुल्ड आर मिसरुल्ड'मध्ये हा उल्लेख करण्यात आलाय. हरनौत या विधानसभेच्या जागेवरून 1977 आणि 1980 मध्ये काँग्रेसच्या भोलासिंह यांच्याकडून नीतीश कुमारांना सलग पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आपल्या मुन्ना सरकार या एका जवळच्या मित्राशी बोलताना 'आता, असं वाटतंय की काहीतरी बिझनेस करावा लागेल' असं वक्तव्य केलं होतं. 

नितीश यांच्या कुटुंबानंही हा पराभव स्वीकारला होता. बीएसई इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या नितीश कुमार यांच्याकडे एखादी नोकरी करण्याचा पर्याय उपलब्ध होता. 

नीतीश कुमार यांची पत्नी  मंजू सेवदह गावातील सरकारी उच्च विद्यालयात शिक्षिका होती. आपल्याला निवडणुकांत आपलं भविष्य आजमावण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी नितीश कुमार यांनी आपल्या पत्नीकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी, मंजू यांनी आपल्या बचत केलेल्या पैशांमधून 20 हजार रुपये नितीश कुमार यांना दिले होते. 

त्यानंतर, विजय नितीश कुमार यांच्या पारड्यात पडला... आणि अखेर 1985 साली नितीश बिहार विधानसभेत दाखल झाले, असं या पुस्तकात म्हटलं गेलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.