अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने  ई-मेल पाठवून ही धमकी दिली आहे. गृह विभागाने पोलिसांना आवश्यक पाऊलं उचलण्याची सूचना दिली आहे. 

Updated: Feb 27, 2016, 12:11 AM IST
अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने  ई-मेल पाठवून ही धमकी दिली आहे. गृह विभागाने पोलिसांना आवश्यक पाऊलं उचलण्याची सूचना दिली आहे. 

आपण शस्त्रास्त्रांची जमवाजमव करत आहे, असं देखील या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. केजरीवाल यांच्या सुरक्षेचा फेर आढावा घेण्यात आला आहे. केजरीवाल यांना सध्या झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. 

केजरीवाल हे सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विशेष सुरक्षेवर ध्यान देण्यात यावं असं दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांना सांगितलं आहे.