जम्मू-काश्मिर : दोडा जिल्ह्यातील एका तरुणाला दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा तरुण पाकिस्तानमध्ये फोन करत असल्याचा ही संशय आहे.
भदेरवाह येथील अशिक अहमद खान असं या तरुणाचं नाव असून याने पाकिस्तानमध्ये फोन केल्याचं आढळून आलं आहे. त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतलं गेलं.
सोशल मीडियावरूनही आरोपी अशिक अहमद खानने वादग्रस्त मजकूर प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले होते. अशिकची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.