सावधान! नाहीतर एकत्र राहणाऱ्याचं लग्न न करता शुभमंगल!

लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. कारण लग्न न करता नवरा-बायकोप्रमाणे, राहणाऱ्या जोडप्याला कायदेशीररित्या विवाहित मानलं जाईल, आणि  पुरूषाच्या संपत्तीत महिलेचाही कायदेशीररित्या हक्क असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Updated: Apr 13, 2015, 11:50 AM IST
सावधान! नाहीतर एकत्र राहणाऱ्याचं लग्न न करता शुभमंगल! title=

नवी दिल्ली : लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. कारण लग्न न करता नवरा-बायकोप्रमाणे, राहणाऱ्या जोडप्याला कायदेशीररित्या विवाहित मानलं जाईल, आणि  पुरूषाच्या संपत्तीत महिलेचाही कायदेशीररित्या हक्क असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

जस्टिस एम.वाय. इकबाल आणि जस्टिस अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. अविवाहीत असलेले मात्र एकत्र राहणाऱ्या जोडप्याला विवाहित मानलं जाईल. गरज पडल्यास अविवाहित असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी सर्वस्वी प्रतिवादी पक्षाची असणार आहे.

खंडपीठाच्या मते, स्त्री-पुरूष बऱ्याच काळापासून एकत्र, सोबत राहणारी स्त्री, ही पत्नी मानली जाईल. तथापी, मजबूत पुरावे देऊन हे बचाव पक्ष हे चुकीचे असल्याचे सिद्ध करू शकतो. हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या पक्षाची असेल, ज्याला हे नातं कायदेशीररित्या हवं नकोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.