नवी दिल्ली : एक रूपयाची नोट झापण्यासाठी १ रूपया १४ पैसे खर्च येत असल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.
एक रुपयांच्या नोटेची २० वर्षानंतर छपाई करण्यात आली आहे.
एक रुपयाच्या नोटेसाठी किती खर्च येतो. याबाबतची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाषचंद्र अगरवाल यांनी मागितली होती. त्यांना मिळालेल्या उत्तरामध्ये १ रुपया १४ पैसे खर्च येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सन १९९४ नंतर नव्यानेच एक रुपयाच्या नोटेची छपाई करण्यात आली. परंतु, चांगल्या दर्जाच्या छपाई मशीनवर ही छपाई करण्यात आल्याने खर्च वाढला असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.