मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा मृत्यू

मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Updated: Jul 2, 2015, 05:11 PM IST
मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा मृत्यू title=

लखनौ : मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

मोबाईल पोटावर ठेवून गाणी ऐकत असताना हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील बहराइच या गावामध्ये मोबाईल स्फोटाची घटना घडली आहे. 

मोबीन नावाच्या युवकाने मोबाईल चार्जिंगला लावून पोटावर ठेवला होता. 

गाणी सुरू असतानाच मोबाईलचा जोरदार स्फोट झाला. स्फोटात मोबीनचा जागीच मृत्यू झाला. 

स्फोट एवढा शक्तिशाली होता की मोबीनच्या शरीराचे अनेक तुकडे विखुरले गेले होते. 

हा मोबाईल चीनी बनावटीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.