...जेव्हा दारुच्या ठेक्यावर मगरीनं दिली धडक!

मेरठच्या देवल गावात दारुच्या ठेक्यावर मंगळवारी सकाळीच एक अनपेक्षित पाहुणा येऊन धडकला... आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच धाबे दणाणले... कारण, हा पाहुणा होता एक भली मोठी मगर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 7, 2014, 04:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेरठ
मेरठच्या देवल गावात दारुच्या ठेक्यावर मंगळवारी सकाळीच एक अनपेक्षित पाहुणा येऊन धडकला... आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच धाबे दणाणले... कारण, हा पाहुणा होता एक भली मोठी मगर...
ही मगर जवळजवळ 8 फूट लांब होती. मंगळवारी सकाळी सेल्समनचे डोळे उघडल्यानंतर सेल्समन डोळे चोळत चोळत बाहरे आला. तेव्हा समोरच त्याला मगर दिसली. त्यानंतर मगरीला दारुच्या ठेक्यावर घुसलेला पाहिल्यानंतर त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. सूचना मिळाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी तिथं तातडीनं दाखल झाले. त्यांनी या मगरीला पकडून जवळच्याच गंगनहरमध्ये सोडून दिलं.
मगरीला मध्य गंगनहरमध्ये सोडल्यानं गावकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय. नगरऐवजी या मगरीला आणखी दुसऱ्या ठिकाणी सोडता आलं असतं, असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. कारण, जवळच सोडल्यानं ही मगर पुन्हा कधीही या गावात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या आणि लहान मुलांच्या जीवाला धोका पोहचण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.