नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होतेय. या बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढाव्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
काँग्रेसचे नेते ए. के. अॅन्टोनी ही बैठक घेणार असून राज्यातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बदलाची राज्यात चर्चा सुरू होती. याबाबत या बैठकीत चर्चा होते का? याबाबतही उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.