सोनिया गांधींना चक्क वाढदिवसाऐवजी जयंतीच्या शुभेच्छा

काँग्रेसचं मुखपत्र 'काँग्रेस संदेश'मध्ये सोनिया गांधींना चक्क वाढदिवसाऐवजी जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.

Updated: Jan 7, 2017, 01:44 PM IST
सोनिया गांधींना चक्क वाढदिवसाऐवजी जयंतीच्या शुभेच्छा  title=

नवी दिल्ली : काँग्रेसचं मुखपत्र 'काँग्रेस संदेश'मध्ये सोनिया गांधींना चक्क वाढदिवसाऐवजी जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. हयात असलेल्या व्यक्तीच्या जन्मदिनास वाढदिवस म्हणतात आणि मृत व्यक्तीच्या जन्मदिनास जयंती म्हणतात. मात्र काँग्रेस संदेशनं हयात अध्यक्षांना थेट जयंतीच्या शुभेच्छा दिल्यानं काँग्रेस संदेश पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सोनिया गांधींना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं वृत्त काँग्रेस संदेशमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं मात्र ते प्रसिद्ध करताना '70वी जयंतीके मौकेपर सोनियाजीको बधाई' असं शीर्षक देण्यात आलं.

वाढदिवसाच्या संपूर्ण वृत्तातही जयंती असाच शब्द वापरण्यात आल्य. विशेष म्हणजे संपादकीयमध्ये जन्मदीन हा शब्द वापरण्यात आलाय.

डॉ. गिरीजा व्यास या काँग्रेस संदेशच्या संपादिका आहेत. तर जयराम रमेश आणि सलमान खुर्शीद हे संपादक मंडळाचे सदस्य आहेत.. असं असताना एवढी गंभीर चूक कशी झाली असा प्रश्न सा-यांना पडलाय.