www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेसला पाठिंबा देणारी भारताची एक सजग मुस्लीम तरुणी म्हणून सध्या घराघरांत दिसणारी `हसीबा अमीन` सध्या अडचणीत सापडलीय. सोशल वेबसाईटवर तिच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला जातोय.
हसीबाचा चेहरा काँग्रेसच्या जाहिरातीमुळे भारतातल्या घराघरात पोहचलाय. `कट्टर सोच नही, युवा जोश` असं म्हणणारी ही तरुणी स्वत:ला एक सामान्य तरुणी म्हणवून घेते. तसचं `अंदाज क्यो हो पुराना` हे गाणं म्हणत काँग्रेसलाच मत देण्याचं आवाहनही लोकांना या जाहीरातीतून करते.
पण, सोशल वेबसाईटवर मात्र हसीनाच्या या जाहीरातीचं पोस्टमॉर्टेम झालंय. हसीना हिचं शशी थरुर यांच्यासोबतच एक चित्रही सोशल ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटसअपवर फिरताना दिसतंय.
हसीबाच्या ट्विटर प्रोफाईलवर आपली ओळख करून देताना ती लिहिते... `अभिमानी भारतीय, अभिमानी मुस्लीम, शांतीप्रिय, लेखक बनण्याची इच्छा ठेवणारी, कविताप्रेमी, प्रेम प्रेमी आणि गोव्याची एनएसयूआयची अध्यक्ष`...
तिची `एनएसयूआय`ची अध्यक्ष ही ओळख मात्र टीकेचं लक्ष्य झालीय. भाजप आणि आप समर्थकांनी तिला चांगलंच फैलावर घेतलंय. इतकंच नव्हे तर तिच्यावर वैयक्तिक टीकाही केली जातेय.
`फ्रेंडस ही मॅडम आहे हसीबा अमीन... आजकाल टीव्ही वर ती लोकांना राहुल गांधींशी जोडण्याचा संदेश देताना दिसतेय. पहिलं तर मलाही वाटलं की ही एखादी सामान्य तरुणी असेल. पण माहिती काढली तेव्हा समजलं की ही `एनएसयूआय`ची अध्यक्ष होती... आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवावी खाऊन आलीय... क्या बात हैं काँग्रेस` असा मॅसेजही हसीनाच्या फोटोसोबत सोशल वेबसाईटवर फिरतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.