उर्जित पटेल यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न

पोलिसांनी कार्यकर्त्यांना उर्जित पेटल यांच्यापासून दूर ठेवलं. मात्र कार्यकर्त्यांनी नोटाबंदीचा विरोध काळे झेंडे दाखवून व्यक्त केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 15, 2016, 09:08 PM IST
उर्जित पटेल यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न title=

कोलकाता : कोलकाता एअरपोर्टवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल, यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. उर्जित पटेल यांना एअरपोर्टवर, काळे झेंडे दाखवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोटाबंदीविरोधात घोषणा दिल्या.

पोलिसांनी कार्यकर्त्यांना उर्जित पेटल यांच्यापासून दूर ठेवलं. मात्र कार्यकर्त्यांनी नोटाबंदीचा विरोध काळे झेंडे दाखवून व्यक्त केला.

उर्जित पटेल एअरपोर्टवर पोहचताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ते कारमधून उतरताच कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले. मात्र पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेळीच रोखलं. नोटाबंदीला विरोध असल्याने कार्यकर्त्यांकडून असं आंदोलन केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.