हैदराबाद : सायकल दुकानात काम करणारा मुलगा हा एका मुलीसोबत लग्न करण्याच्या लायक आहे की नाही यावर हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. ऐवढंच नाही तर हायकोर्टाने याबाबत माहिती काढण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. संपूर्ण राज्यात सध्या याच मुलीची चर्चा आहे कारण ती मुलगी आहे मुख्यमंत्र्यांची.
तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दत्तक घेतलेली मुलगी प्रत्यूषा ही एका २९ वर्षीय वेंकेटच्या प्रेमात पडली आहे आणि तिला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे.
हाईकोर्टाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, 'कोर्टने प्रत्यूषाला आधी शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं आहे पण मुलगी आधी लग्नाच्या मुद्यावर ठाम आहे. हाईकोर्टाने आंध्रप्रदेशच्या सीआयडीला या मुलाच्या कुटुंबियांची माहिती काढण्यास सांगितलं आहे. यानंतर यावर सुनावणी होणार आहे.'
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार १९ वर्षीय प्रत्यूषाची सावत्र आई तिला खूप त्रास देत होती त्यानंतर पोलिसांनी तिच्या सख्या आई-वडिलांना अटक केली आणि हायकोर्टाने मुलीची जबाबदारी घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी यामुलीची चौकशी केली होती आणि तिचं संपूर्ण पालनपोषण करण्याची जबाबदारी जाहीर केली होती.
मेडिकलचं शिक्षण घेत असतांनाच प्रत्यूषाची आणि सायकलच्या दुकानात काम करणाऱ्या वेंकट यांची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम झालं.