लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षातील यादवी शमल्यानंतर लखनौमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय.

Updated: Jan 1, 2017, 12:20 PM IST
लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन title=

लखनऊ : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षातील यादवी शमल्यानंतर लखनौमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय.

इथल्या जनेश्वर मिश्र पार्क इथं हे अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. या अधिवेशनात अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनात अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ काही प्रस्ताव पारीत केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

निलंबन रद्द झाल्यानंतर अखिलेश यादव यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळालाय. कट रचणा-यांचा राष्ट्रीय अधिवेशनात पर्दाफाश करु असे अखिलेश यांनी शनिवारी म्हटलंय. तर या अधिवेशनात घेण्यात येणारा निर्णय सर्वमान्य राहिल असं रामगोपाल यादव यांनी म्हटलंय..