नवी दिल्ली : इंडोनेशियातल्या बाली इथून छोटा राजनला घेऊन निघालेलं भारतीय तपास यंत्रणांचं पथक पहाटे दिल्लीत दाखल झालं.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला दिल्ली विमानतळावर विमान उतरलं. त्यानंतर साधारण पाऊणे सहा वाजण्याच्या दरम्यान छोटा राजनला घेऊन, तपास यंत्रणा दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयाकडे रवाना झाली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर छोटा राजन संदर्भातली सर्व प्रकरणं, सीबीआयकडे वर्ग करण्यात येत आहेत. राज्याचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी ही माहिती दिलीय.
बाली इथून निघण्यापूर्वी आपण आपल्या मायदेशात परततोय, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया राजननं गुरुवारी दिली होती. मात्र, राजनला भारतात परतण्याचा आनंद झाला असला तरी सुमारे पाऊणशे खटले त्याची वाट बघताहेत. किडनीच्या विकारानं त्रस्त असलेल्या राजनच्या डायलिसिसची व्यवस्था, तसंच खटला चालवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय त्याच्या कोठडीतच केली जाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.