१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं

चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. 

Updated: Sep 15, 2014, 07:24 PM IST
१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं title=

नवी दिल्ली: चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. 

चीनी जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना आव्हान देण्याचे उद्योग गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. ११ सप्टेंबर रोजी ३० चीनी सैनिक भारतीय हद्दीच्या अर्धा किलोमीटर आत आले आणि त्या भागात त्यांनी तंबूही उभारला होता. 

यानंतर आता ३०० चिनी सैनिकांनी चुमूर भागात घुसखोरी १०० भारतीय जवानांना घेरल्याचे वृत्त आहे. यामुळे नियंत्रण रेषेवरील वातावरण चांगलेच तापले आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.