रेल्वेतून वीज निर्मिती करू इच्छितात मोदी!

 पीएमओ (प्राइम मिनिस्टर ऑफिस) आणि इंडियन रेल्वे आजकाल गुजरातच्या एका ८१ वर्षीय आजोबांच्या विचित्र आयडीयावर डोकं खाजवत बसले आहेत. अहमदाबादचे रहिवासी विपीन त्रिवेदी यांनी पीएमओला सल्ला दिला की, रेल्वे ट्रॅकवर पवन चक्की लावून वीज निर्मीत केली जाऊ शकते. त्यांच्यामते रेल्वे चालल्यावर निर्माण होणारा हवेच्या दाबाचा वापर करून वीज निर्मिती व्हायला हवी. 

Updated: Sep 15, 2014, 07:22 PM IST
रेल्वेतून वीज निर्मिती करू इच्छितात मोदी! title=

नवी दिल्ली :  पीएमओ (प्राइम मिनिस्टर ऑफिस) आणि इंडियन रेल्वे आजकाल गुजरातच्या एका ८१ वर्षीय आजोबांच्या विचित्र आयडीयावर डोकं खाजवत बसले आहेत. अहमदाबादचे रहिवासी विपीन त्रिवेदी यांनी पीएमओला सल्ला दिला की, रेल्वे ट्रॅकवर पवन चक्की लावून वीज निर्मीत केली जाऊ शकते. त्यांच्यामते रेल्वे चालल्यावर निर्माण होणारा हवेच्या दाबाचा वापर करून वीज निर्मिती व्हायला हवी. 

विपीन त्रिवेदी बँक ऑफ बडोदाच्या अँग्रकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट विंगमध्ये काम करीत होते. त्यांनी पीएमओला पत्र पाठवून ही आयडीयाला दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार पीएमओने हे प्रकरण रेल्वे मंत्रालयाला पाठवून या आयडीयाची अमंलबजावणीच्या संभावना पडताळणी करण्यासाठी उत्तर मागविले आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाला या संदर्भातील नियमित अपडेट देण्यासही सांगितले आहे. 

पीएमओकडून पत्र मिळाल्यानंतर रेल्वे मंत्रालयातील अधिकारी विपीन त्रिवेदींसोबत चर्चा करीत आहेत. दरम्यान, अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, अशा प्रकारचे तंत्रज्ञान बनविणे शक्य नाही. त्यांना रेल्वेकडून तांत्रिक माहिती घेण्यासाठी दिल्लीला बोलावण्यात येऊ शकते. 

त्रिवेदींनी सांगितले की, एके दिवशी रेल्वे टॅकच्या बाजुला फिरताना मला ही आयडीया आली. त्यांनी ही आयडीया गुजरात पॉवर सेक्टरमध्ये काम करणारे आणि सध्या पीएमओमध्ये अतिरिक्त प्रिंसिपल सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या आपल्या मित्राला पाठवली. 

आता त्रिवेदी दिल्लीला आपल्याला कधी बोलावतात याची वाट पाहत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, रेल्वे मंत्रालयातील कोणालाही ही आयडीया अस्तित्वात येणे अशक्य वाटते. त्यांनी त्रिवेदींच्या पत्राला उत्तर देताना सांगितले की, एक ट्रेन फक्त २० सेकंदात पवन चक्कीला मागे टाकेल. पवन चक्कीपासून दर १५ मिनिटांनंतर ट्रेन जाणार पवन चक्की केवळ २५ मिनीट चालेल. यातून जेवढी वीज तयार होईल, त्या पेक्षा अधिक पवनचक्की बसविण्यावर खर्च येईल. या उत्तरानंतर पुन्हा रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या तंत्रज्ञानावर चर्चा करण्याचेही सांगितले आहे. 

रेल्वे अधिकारी याबाबत पीएमओला उत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्याच्यानुसार देशात कोणालाही चांगली कल्पना सुचू शकते. ते ती पीएमओला पाठवू शकतात. त्या कल्पनांची अमलबजावणी होते की नाही ते पाहण्याचं काम आमचं आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.