दाऊशी संबंध असलेल्या मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांची नावे सांगितले राजनने

इंडोनेशियातून अटक करून दिल्लीत आणण्यात आलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या चौकशीत त्याने दाऊद आणि मुंबई पोलिसांच्या संबंधावरील अनेक गुपीतं उघड केली आहेत. 

Updated: Nov 6, 2015, 08:30 PM IST
दाऊशी संबंध असलेल्या मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांची नावे सांगितले राजनने title=

नवी दिल्ली : इंडोनेशियातून अटक करून दिल्लीत आणण्यात आलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या चौकशीत त्याने दाऊद आणि मुंबई पोलिसांच्या संबंधावरील अनेक गुपीतं उघड केली आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार राजनची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांतील काही अधिकारी नेहमी दाऊदच्या संपर्कात होते. राजन याने त्या अधिकाऱ्यांची नावेही सीबीआयला सांगितली. 

इंडिया टुडेच्या बातमीनुसार राजन याने आरोप लावला की, मुंबई पोलिसांनी माझ्यावर खूप अत्याचार केले आहेत. 

बातमीनुसार राजनची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई पोलीसातील काही सेवानिवृत्त अधिकारी दाऊद आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात दुवा म्हणून काम करतात. 

गेल्या २७ वर्षांपासून फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सीबीआय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एका टीमच्या सहाय्याने दिल्ली आणण्यात आले. त्याच्या विरोधात दिल्ली, मुंबईतील विविध हत्या, खंडणी आणि अमंल पदार्थांची तस्करीचे असे ७० प्रकरणात खटला चालविता येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.