मोदींना शह देण्याआधीच हे काय?

बिहारमध्ये मुलायम सिंह यादव यांचा समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहेत. नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय समाजवादी पक्षाच्या संसदीय दलाने घेतलाय. मोदींना शह देण्याआधीच आघाडीत फूट पडली.

Updated: Sep 3, 2015, 09:30 PM IST
मोदींना शह देण्याआधीच हे काय? title=

पाटणा : बिहारमध्ये मुलायम सिंह यादव यांचा समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहेत. नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय समाजवादी पक्षाच्या संसदीय दलाने घेतलाय. मोदींना शह देण्याआधीच आघाडीत फूट पडली.

निवडणुकीसाठी फक्त ५ जागा दिल्यानं मुलायम सिंह यादव नाराज होते. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी अपमानित केल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केलाय.

बिहारच्या निवडणुका स्वबळावर लढू असा विश्वास रामगोपाल यादव यांनी व्यक्त केलाय. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या जनता परिवारात अवघ्या काही महिन्यांतच फूट पडलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.