नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती दिवसेंदिवस नीचांकी पातळी गाठतायत. यामुळे पेट्रोलच्या किंमतीवरही मोठा परिणाम होतोय. व्हेनेझुएला येथे सध्या पेट्रोलचे दर १.३६ रुपये प्रति लीटरवर आलेत. तर भारताचा शेजारील देश पाकिस्तानात पेट्रोलचे दर ४९ रुपये ४७ पैसे प्रति लीटर आहेत.
या देशांत भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल
भारताची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ५९ रुपये ९९ पैसे इतका आहे.
1. व्हेनेझुएला: १ रुपये ३६ पैसे
2. सौदी अरेबिया : १५ रुपये ५९ पैसे
3. इराण: २१ रुपये ६८ पैसे
4. अमेरिकाः ३९ रुपये ४० पैसे
5. पाकिस्तान: ४९ रुपये ४७ पैसे
या देशांत भारतापेक्षा महाग पेट्रोल
1. श्रीलंका: ६० रुपये ३१ पैसे
2. चीनः ६० रुपये ९९ पैसे
3. बांगलादेश: ८० रुपये ६४ पैसे
4. ब्रिटनः ९८ रुपये २६ पैसे
5. हाँगकाँग : १२१ रुपये ९७ पैसे