श्रीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन केलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये शहापू कंदी भागात सीमारेषेजवळ पाकिस्ताननं गोळीबार केलाय.
पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलंय. शनिवारी रात्री पूंछमध्ये ग्रेनेड हल्ला झाला होता.
त्या हल्ल्यामध्ये अमरनाथला जाणारे पंधरा भाविक जखमी झाले होते. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यानंतर काही तासांतच म्हणजेच रविवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला.