नवी दिल्ली : आचार्य अत्रेंच्या ११८ व्या जयंती निमित्त २०१६ चा आचार्य अत्रे पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला.
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतीक मंत्री विनोद तावडेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बाबासाहेबांनी अत्रेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.