दिल्ली : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
हल्लीच दिल्ली क्राइम ब्रांचने करोल बागेतील अक्साई कंपनीच्या शोरुमवर छापे टाकल्यावर या गोष्टीचा खुलासा झाला आहे. फक्त बनावट आयफोनचं नाहीत, तर दुसऱ्या स्मार्टफोनचे असेम्बलिंग मटेरियल या छाप्यामध्ये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
मोबाईलफोनच्या अॅक्सेसरीजच्या जगतात अक्साई कंपनीचे फार मोठे नाव आहे.पोलिसांनी या शोरुमला टाळे ठोकले आहे. या छाप्यामध्ये अठ्ठावीस आयफोन ५ तर सहा आयफोन ६ जप्त केले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.